Department of Education | बंडू आमदूरकर: शिक्षण विभागाचा आत्मा -NNL
नांदेड जिल्हा परिषद शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर हे जिल्ह्या भरातातील शिक्षकांच्या मदतीला अडीअडचणी धावून जाणारे अधिकारी .ते 30जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत .शिक्षण विभागाचा " आत्मा " असे त्याचे संबोधन व्हायचे आणि ते अगदी बरोबर होय .त्याच्या कार्याचा थोडक्यात आढावा जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी व साहित्यिक व्यंकटेश चौधरी यांनी घेतला आहे
एकदा बंडूला मी विचारलं, 'खूप ताण येतो तेव्हा तुम्ही काय करता?'
'काही नाही, कामांमध्ये स्वतःला व्यस्त करून घेतो', तो उत्तरला.
मला नवलच वाटतं या माणसाचं. कायम, सतत कामात व्यस्त. या कामातूनही फोनवर उत्तरं देणार. डोक्यात हजारो कामांची जंत्री, तरीही आता कोणतं काम करायचं याचं प्राधान्य लक्षात राहणार. नाही हे उत्तर वरिष्ठांना कधीच नाही. सोपवलेलं काम बरहुकूम करणार. तेही अचूक, अपेक्षित, वेळेवर! जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागाचा कोणताही पुरस्कार स...
