नगरपालिका कर्मचारी संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी बलभीम शेंडगे यांचे बिनविरोध निवड -NNL
नांदेड। महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/ संवर्ग कर्मचारी संघटना मराठवाडा अध्यक्षपदी बलभीम शेंडगे यांची बिनविरोध निवड श्रीराम मंगल कार्यालय खोपोली जि. रायगड येथे नुकतीच करण्यात आली.
माजी अध्यक्ष मारोती गायकवाड हे सेवानिवृत्त झाल्यामुळे मराठवाडा अध्यक्ष पद रिक्त होते. रायगड जिल्ह्यातील श्रीराम मंगल कार्यालय खोपोली येथे नुकतीच राज्य स्तरीय सर्वसाधारण सभेचे आयोजित करण्यात आले होते. त्यात मुखेड येथील कर्मचारी जिप्सीभूषण बलभीम शेंडगे यांची राज्याध्यक्ष सुरेश पोस्तांडेल यांच्या सूचनेनुसार कोअरकमिटी सदस्य विश्वनाथ घुगे व माजी अध्यक्ष मारोती गायकवाड यांनी बलभीम शेंडगे यांची बिनविरोध निवड करत असल्याची घोषणा केली.
यावेळी उपस्थितांनी बलभीम शेंडगे यांना अनुमोदन दिले. यापूर्वी बलभीम शेंडगे यांनी महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/ संवर्ग कर्मचारी संघटना नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष पद अनेक वर्ष...
