Raje Madhukarrao Deshmukh ; राजे मधुकरराव देशमुखांनी सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक अवकाश समृद्ध केला बालाजी इबीतदार यांचे प्रतिपादन
नांदेड l राजे मधुकरराव देशमुख हे बहुआयामी लेखक होते. त्यांना अनेक भाषा अवगत होत्या. त्यांचे शिकार या विषयावरचे लेखन अद्वितीय असून प्रत्यक्ष जंगलात भटकंती करून त्यांनी हे लेखन केले आहे. राजे देशमुख यांनी केवळ साहित्याच्याच प्रांतात कार्य केले नसून त्यांनी माहूर परिसराचा सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक अवकाश समृद्ध केला. असे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडचे अध्यक्ष बालाजी इबीतदार यांनी केले.
श्री जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाने आयोजित केलेल्या शिकारी लेखक राजे मधुकरराव देशमुख यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त उद्घाटक म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष जयकुमार भोपी हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून साहित्यिक देवीदास फुलारी, उद्योगपती गजानन मुधोळ पाटील, राजकुमार भोपी, कवयित्री सुधाताई नरवाडकर , कवी बापू दासरी, गुरुमाऊली लक्ष्मीबाई, स्वाती आडे आणि मुक्ता ...
