Wednesday, May 13

Tag: / Author:- Dharmabhushan Ad.Dilip Thakur

Island of Andaman : अंदमानच्या बेटावरून (भाग ७ ) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

Island of Andaman : अंदमानच्या बेटावरून (भाग ७ ) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, लेख
अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सिद्धहस्त लेखन शैलीतून रोमांचकारी असणारा अंदमान टूर चा रोज चा वृत्तांत याच ठिकाणी दररोज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कृपया वाचकांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती. - संपादक पृथ्वीवर असलेल्या दळणवळणाच्या सर्व साधनाचा वापर अंदमान टूर मध्ये झालेला आहे.नांदेड हैद्राबाद नांदेड रेल्वे प्रवास,हैद्राबाद श्री विजयपुरम हैद्राबाद विमान प्रवास,श्री विजयपुरम इतर बेटांना जातायेतांना केलेला क्रुझ, स्टिमर,स्पीड बोटचा प्रवास,बारतांग ला जाता येताना केलेला रस्त्याचा वापर,समुद्रातील जीवन सृष्टी पाहण्यासाठी पाण्याखालून सब मरीन ने मारलेला फेरफटका आणि चुनखडी च्या गुहा पाहण्यासाठी जंगलात केलेली अडीच किलोमीटर ची पायपिट यामुळे जल, भूमी,आकाश या तिन्ही ठिकाणी विहार झालेला आहे. रात्री दोन वाजता वेक अप कॉल ने उठल्या नंतर एका तासात सर्व जण तय्यार झाले.ब्रेकफास्ट...
Island of Andaman : अंदमानच्या बेटावरून (भाग ६ ) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

Island of Andaman : अंदमानच्या बेटावरून (भाग ६ ) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, लेख
अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सिद्धहस्त लेखन शैलीतून रोमांचकारी असणारा अंदमान टूर चा रोज चा वृत्तांत याच ठिकाणी दररोज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कृपया वाचकांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती. - संपादक  हॅवलॉक आयलँड बीच रिसॉर्टवर पहाटेच जाग आली ती निरनिराळ्या पक्षांच्या आवाजाने. रूमच्या बाहेर येऊन पाहिले तर आमच्या रिसॉर्टच्या कंपाउंड पर्यंत समुद्राचे पाणी आलेले होते.शांत वातावरणात समुद्राचे निरीक्षण करणे खूपच आल्हाददायक वाटत होते.अर्धा तास मॉर्निंग वॉक केला. त्यानंतर रिसॉर्ट मध्ये असलेल्या स्विमिंग पूल वर मनसोक्त पोहण्याचा आनंद लुटला.काल रिसॉर्ट मध्ये आल्यानंतर जे गोड नारळ पाणी आम्हाला वेलकम ड्रिंक म्हणून दिले होते त्याची आठवण झाली. वेटरला सांगून दोन नारळ पाणी पिले. सकाळी साडेआठ वाजता सर्वजण आपापल्या बॅगा घेऊन पुढील प्रवासासाठी तयार झाले होते. अमेरिकन ब्रेकफास...
Amarnath \ अमरनाथ गुहेतून भाग – ८ / लेखक :- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

Amarnath \ अमरनाथ गुहेतून भाग – ८ / लेखक :- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

लेख, नांदेड
सर्व अमरनाथ यात्रेकंरू गुलमर्गला जाण्यासाठी तयार होऊन ठीक ७ वाजता बसने रवाना झालो. सकाळी कमी थंडीत अतिशय निसर्गरम्य वातावरणात काश्मीर मधील सुंदर दृश्य मनमोहून टाकत होते. काश्मीर मधील दरी खोऱ्यातील सुचीपर्णी ,चिनार वृक्षाची दाट झाडी सर्वाचे लक्ष वेधून घेत होते.थोडे फार ऊन असल्यामुळे १० नंतर थोडा उकाडा जाणवत होता. अमरनाथच्या तब्बल २३ यात्रा केल्या पण असा काश्मीर मधील प्रसंग क्वचितचं पहिल्यांदाच पहायला मिळाला.गाड्या AC असल्यामुळे तितका उकाडा जाणवला नाही.गूलमर्ग साठी सर्वजण मार्गस्थ झाले असता, रस्त्यात एका हॉटेलवर नाश्ता करण्यासाठी गाडी थांबविण्यात आली.तेथील तजेलदार आलू पराठे याचा मनसोक्त आनंद घेतला. यात्रेकरूंची संख्या जास्त असल्यामुळे अनेकांना पोहे नाश्ता करावा लागला. गुलमर्गला हॉटेलचे दर जास्त असल्यामुळे सुरेखा रहाटीकर, व्यंकट वायगावकर,माधुरी सुवर्णकार या तिघांकडून नाश्ता देण्यात आला. पर...
Amarnath cave | अमरनाथ गुहेतून भाग- 5 / लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

Amarnath cave | अमरनाथ गुहेतून भाग- 5 / लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, लेख
मोठ्या गाड्यांना सात नंतर शहरात प्रवेश बंदी असल्यामुळे हॉटेल मालाबार मधून सर्व सामान घेऊन सकाळी आम्ही साडेसहाला निघालो. सुरुवातीला पाहिले हजरत बल दर्गा. अशी आख्यायिका आहे की या ठिकाणी मोहम्मद पैगंबर त्यांच्या दाढीचा एक केस जपून ठेवण्यात आलेला आहे. नेहमी बातम्यांमध्ये हजरतबलचा उल्लेख असतो. काही वर्षांपूर्वी अतिरेक्यांनी हजरत बल दर्गा मध्ये तळ ठोकला होता. तेव्हापासून हा परिसर बराच सेन्सिटिव्ह आहे. या दर्ग्याच्या ठिकाणी अनेक कबुतरे आहेत.दाणे टाकले की ते अगदी आपल्याजवळ येऊन दाणे टिपतात. इतक्या मोठ्या संख्येने कबूतर पाहून अनेकांनी फोटो शूट केले. त्यानंतर आमचा मोर्चा वळला तो खीर भवानी मंदिराकडे. तेथील पुजारी विजय शर्मा यांनी मंदिराबद्दलची माहिती दिली. लंकेमध्ये रावणाने भक्ती करून पार्वती मातेला आणले.परंतु राम रावण युद्धात फार मनुष्यहानी झाली असल्यामुळे पार्वती मातेने हनुमानाला सांगून जल रूपात...
error: Content is protected !!