The joy of the beloved sisters : नांदेडच्या नवा मोंढा मैदानावर लाडक्या बहिणींचा आनंद सोहळा साजरा होणार – NNL
नांदेड| संपूर्ण महाराष्ट्रातील महिला भगिनींसाठी आर्थिक सक्षमीकरणाची क्रांती ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व अन्य योजनांचा आनंद सोहळा ७ ऑक्टोबरला नांदेडमध्ये होत आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील हजारो महिला सहभागी होणार असून प्रशासन या दृष्टीने तयारीला लागले आहे.
राज्य शासनाने मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान सुरू केले असून या संकल्पनेतून सर्व जिल्ह्यांमध्ये राज्य शासनाच्या पथदर्शी योजनांमधील लाभार्थ्यांची संवाद साधने व त्यांना प्रत्यक्ष या योजनाचा कार्यक्रमांमध्ये लाभ देणे सुरू आहे. विविध जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत कार्यक्रम झाले असून आता नांदेडमध्ये देखील ७ ऑक्टोबरला हा कार्यक्रम होणार आहे.
आज या संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी ...
