Saturday, June 27

Tag: at Sahasrakund Falls!

Sahasrakund News : सहस्रकुंड धबधब्यात जीवघेणी घटना टळली!

Sahasrakund News : सहस्रकुंड धबधब्यात जीवघेणी घटना टळली!

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध सहस्रकुंड धबधबा येथे आज (13 नोव्हेंबर) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास भीषण दुर्घटना टळली. पैनगंगा नदीच्या प्रवाहात पाच महिला मजूरदारांसह दोन लहान मुले अडकली होती. स्थानिक नागरिक, महसूल व पोलिस प्रशासनाच्या तत्परतेमुळे सर्वांना सुखरूप वाचवण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी गेलेल्या मजूर महिलांचा हा समूह त्यांच्या मूळ गावी एकंबा येथे परतत होता. दरम्यान, पैनगंगा नदी पात्रातून जात असताना मुरली येथील उच्च पातळी बंधाऱ्यातून पूर्वसूचना न देता पाणी सोडण्यात आल्याने नदीचा प्रवाह अचानक वाढला. त्यामुळे या महिलांसह दोन बालके नदीच्या मध्यभागी अडकली. अडकलेल्या मजूरदारांमध्ये गजराताई काटेवाड, कोमल काटेवाड, सुवर्णा गांदरवाड, कामिनी गांदरवाड, अनुसया दिगंबर तळमवाड, विनायक गांदरवाड (८ म...
error: Content is protected !!