Children’s heart disease screening camp : लोटस हॉस्पिटलमध्ये लहान मुलांचे हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न -NNL
नांदेड| शहरातील लोटस हॉस्पिटल येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान व राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत लहान मुलांच्या हृदयरोगाचे निदान व उपचार शुक्रवार, दि. १६ ऑगस्ट रोजी शिबिर घेण्यात आले या शिबिराला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे . या शिबिराचे नियोजन नांदेड जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन जिल्हा शल्य चिकित्सर डॉ. निळकंठ भोसीकर आणि आर.बी.एस.के चे जिल्हा नियोजन अधिकारी डॉ.अनिल कांबळे व टीम आणि लोटस हॉस्पिटलचे संचालक डॉ.संजय पडलवर यांच्यामुळे शक्य झाले.
हृदयरोग ग्रस्त सर्व मुलांवर राष्ट्रीय आरोग्य अभियान व राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत विविध शासकीय आरोग्य योजनाच्या अंतर्गत उपचार करण्यात येतात तसेच लहान मुलांच्या हृदयरोगाचे निदान व उपचार शिबिर लोटस हॉस्पिटलमध्ये गेल्या तीन वर्षापासून सातत्याने दर महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी घेण्यात येते या शिबीरात ह्दयरोग निदानाबरोबरच ९० लहान मुलांची...
