S. Manmeet Singh Kunjwale as Yuvasena City Chief | युवासेना शहर प्रमुख पदी स.मनमित सिंग कुंजीवाले – NNL
नांदेड| हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेनाप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या प्रमुख उपस्थितीत आ.बालाजीराव कल्याणकर यांच्या शिफारशीनुसार नांदेड शहर युवासेना शहर प्रमुख पदी स.मनमित सिंग कुंजीवाले यांची नियुक्तीची घोषणा करून नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समवेत उत्तरचे आ. बालाजीराव कल्याणकर यांची उपस्थिती होती.
यावेळी शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की वंदनीय हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण यांचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण नागरिकांच्या न्याय हक्कासाठी कार्य सुरू केले असून आपल्या सामाजिक कार्याची दखल घेत स.मनमितसिंग कुंजीवाले यांची युवासेना शहर प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.
स.मनमित स...
