Saturday, June 27

Tag: as the best ART center

best ART center : महाराष्ट्र राज्याला सर्वोत्तम ए.आर.टी. केंद्र म्हणून सन्मान 

best ART center : महाराष्ट्र राज्याला सर्वोत्तम ए.आर.टी. केंद्र म्हणून सन्मान 

नांदेड, आरोग्य
नांदेड| केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था (NACO) यांनी घेतलेल्या राष्ट्रीय स्तरावरील आढावा मोहिमेत महाराष्ट्राने उत्कृष्ट कामगिरी बजावत देशातील सर्वोत्तम राज्य म्हणून मान मिळवला आहे. सप्टेंबर २०२५ च्या अंतिम गुणपत्रिकेत ७५ पेक्षा अधिक गुणांची नोंद करणाऱ्या 'ग्रीन झोन'मधील १६ केंद्रांपैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेडचे ए. आर.टी. केंद्र सर्वोत्कृष्ट केंद्र म्हणून निवडले जाऊन गौरविण्यात आले. मागील वर्षी २०२४-२५ मध्ये अंतिम गुणपत्रिकेत एकूण १४ इंडिकेटर मध्ये ए.आर.टी. केंद्र नांदेडचे गुण ३८ होते ते एका वर्षात वाढून ७५ झाले. वर्ष अखेरीस ए.आर.टी. घेणारे पीएलएचआयव्ही रुग्णांचे रिटेंशन चे प्रमाण १०० टक्के कायम ठेवण्यात केंद्र यशस्वी ठरले आहे.  वर्षाच्या अखेरीस वायरल लोड सप्रेशन रेट ९७ टक्के ठेवण्यात यशस्वी ठरले आहे. गर्भवती महिलांचा...
error: Content is protected !!