Gurudwara Sri Nanaksar Sahib : गुरुद्वारा श्री नानकसार साहिब येथे सालाना बरसी उत्साहात साजरी -NNL
नांदेड| विष्णुपुरी येथील गुरुद्वारा श्री नानकसार साहिब येथे संतां ची सालाना बरसी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सचखंड गुरुद्वारा चे मुख्य पुजारी सिंघ साहिब संत बाबा कुलवंतसिंघ जी, लंगर साहिब गुरुद्वारा चे प्रमुख संत बाबा नरिंदरसिंघ जी कारसेवावाले व संत बाबा बलविंदरसिंघ जी कारसेवावाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
महान कारसेवक सचखंडवासी संत बाबा दलीपसिंघ जी ,सचखंडवासी संत बाबा जीवनसिंघजी, सचखंडवासी संत बाबा हरिसिंघ जी आणि सचखंडवासी संत बाबा शीशासिंघ जी कारसेवा वाले यांची सालाना बरसी श्रद्धेने साजरी करण्यात आली. या शुभप्रसंगी श्री अखंड पाठ,संत, थोर सद्गुणी व रागी सज्जन कीर्तन व प्रवचन झाले. वाजेगव ते शिकारघाट, शिकारघाट ते हिरा घाट आणि विद्यापीठ ते रतनगड पर्यंतचा रस्ता आणि शिकारघाट येथील गोदावरी नदी वरील पुल संत बाबा दलीपसिंघ जी...
