Tuesday, May 26

Tag: ‘Anahat’ to be released on Sunday

Poetry Collection : व्यंकटेश चौधरी यांच्या ‘अनाहत’ काव्यसंग्रहाचे रविवारी प्रकाशन

Poetry Collection : व्यंकटेश चौधरी यांच्या ‘अनाहत’ काव्यसंग्रहाचे रविवारी प्रकाशन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड महानगरपालिकेचे माजी शिक्षणाधिकारी साहित्यिक व्यंकटेश चौधरी यांच्या 'अनाहत' काव्यसंग्रहाचे प्रसिद्ध साहित्यिक देवीदास फुलारी यांच्या हस्ते दि. १६ नोव्हेंबर रोजी प्रकाशन करण्यात येणार आहे. नांदेडच्या दत्ता डांगे यांच्या इसाप प्रकाशन संस्थेने हा काव्यसंग्रह प्रकाशनासाठी सिद्ध केला आहे. महाराष्ट्रातील ख्यातकीर्त चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी अनाहतचे अमूर्त शैलीत देखणे मुखपृष्ठ तयार केले आहे. सहस्रकुंड येथे आयोजित प्रकाशन सोहळ्यास मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदेड शाखेचे अध्यक्ष बालाजी इबितदार, बाल साहित्यिक, कवी पंडित पाटील आदींची मान्यवर उपस्थित राहणार आहेत. व्यंकटेश चौधरी यांचा हा तिसरा काव्यसंग्रह असून यापूर्वी त्यांचे गंधबन (निर्मल प्रकाशन), एक शून्य प्रतिक्रिया (शब्दालय प्रकाशन) हे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. तसेच बालकुमार वाचकांसाठी लिहिलेले लालबहादूर शास्त्री, ...
error: Content is protected !!