Friday, June 26

Tag: along Godavari river

Nande Flood : गोदावरी नदीकाठच्या भागाला पुराने वेढले ; एकाचा मृत्यू

Nande Flood : गोदावरी नदीकाठच्या भागाला पुराने वेढले ; एकाचा मृत्यू

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड (प्रतिनिधी) मराठवाड्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. वरच्या प्रकल्पांतून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे तब्बल १६ दरवाजे उघडण्यात आले असून दोन लाख क्युसेसहून अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे बुधवारी सकाळपासून शहरालगतच्या नदीकाठच्या बहुतांश भागांना पुराने वेढा घातला. गोवर्धन घाट, नावघाट पूल पाण्याखाली गेले असून वाघी रस्ता, सैलाब नगर, खडकपुरा, गाडीपुरा, पंचवटी नगर, जुन्या पुलालगतचा देगलूर नाका परिसर जलमय झाला आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंचवटी नगरात अडकलेली एक वृद्ध महिला, तिचा मुलगा व २३ पशुधन यांना मनपा अग्निशमन दलाने बोटीच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर काढले. दरम्यान, प्रशासनाने आधीच नागरिकांना सावधगिरीचे आवाहन केले होते; परंतु अनेक कुटुंबे शेवटच्या क्षणापर्यंत घरात...
error: Content is protected !!