Ajit Pawar : सिडकोत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
नवीन नांदेड़| महाराष्ट्र राज्याचे लाड़के ऊपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अजीत पवार यांचे विमान अपघातात बारामती येथे निधन झाल्याचे कळताच सिडको हडकोतील सर्व पक्षाचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करून सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात आली .
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या 28 जानेवारी रोजी विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याची घटना कळताच सिडको हडको परिसरातील सर्व पक्षीय व सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील सर्वांनी हडको येथे एकत्र येऊन श्रद्धांजली अर्पण केली,यावेळी भाजपाचे नगरसेवक संजय पाटील घोगरे, नगरसेवक वैजनाथ देशमुख, शिवसेना दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटिल गिरडे मनपाचे माजी विरोधी पक्षनेते जीवन पाटिल घोगरे , नगरसेवक प्रतिनिधी सतीश पाटील बस्वदे,राजू लांडगे, साहेबराव मामीलवाड,संभाजी ब्रिग...
