Agristack scheme : अॅग्रीस्टॅक योजना आणि नांदेड जिल्ह्यात योजनेची प्रभावी अंमलबजावणी !
शेती हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि कृषी क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवण्यासाठी शासनाने ‘अॅग्रीस्टॅक’ (AgriStack) ही योजना सुरू केली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना एक शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) दिला जात आहे. हा क्रमांक मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या माहितीवर आधारीत विविध सरकारी योजनांचा लाभ सहज मिळणार आहे.
नांदेड जिल्ह्यात ‘अॅग्रीस्टॅक’ची प्रभावी अंमलबजावणी
नांदेड जिल्ह्यात कृषीक्षेत्र विस्तृत आहे आणि येथे लाखो शेतकरी विविध पिके घेतात. शासनाने नांदेडमध्ये ‘अॅग्रीस्टॅक’ची अंमलबजावणी प्रबळपणे सुरू केली आहे. जिल्ह्यातील सीएससी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर शेतकरी नोंदणी होत आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट अनुदाने, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांचा जलद लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
शेतकरी ओळखपत्र क्रमांकाचे मह...
