Hunger stricke : अनुदान द्या, अन्यथा जीवन संपवू! — पोटा (बु.) येथे उपोषणकर्त्यांचा आक्रमक इशारा
हिमायतनगर, अनिल मादसवार | तालुक्यातील पोटा (बु.) येथे राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) अंतर्गत मंजूर दुधाळ गाई-म्हशींच्या अनुदानासाठी सुरू असलेले आमरण उपोषण रविवारी सातव्या दिवशी अधिकच आक्रमक झाले. “तातडीने अनुदान द्या, अन्यथा जीवनयात्रा संपवू,” असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
कृषी मंत्र्यांनी कृषी आयुक्तांना चौकशीचे निर्देश दिल्याची माहिती असली तरी चार दिवस उलटूनही जिल्हा कृषी अधीक्षक, नांदेड तसेच सहसंचालक स्तरावर ठोस हालचाल न दिसल्याने “मंत्र्यांच्या सूचनेलाही खो दिला जातो आहे का?” असा सवाल ग्रामस्थ उपस्थित केला जात आहे.
४५ लाभार्थी, खरेदी पूर्ण; अनुदान मात्र रखडले
२०२५ मध्ये उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व पर्यवेक्षक यांच्या उपस्थितीत शासन निर्णय क्र. शाशोअ २०१९ प.क्र.१५०/१९/०४ दि. ५ सप्टेंबर २०१९ नुसार कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम ...
