Friday, June 26

Tag: against those transporting cattle illegally

Local Crime Branch : अवैधरित्या गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 9.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

Local Crime Branch : अवैधरित्या गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 9.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राईम, नांदेड, व्हिडीओ
नांदेड| स्थानिक गुन्हे शाखा नांदेडने अवैध पद्धतीने गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई केली. आलुपन मार्केटजवळ गाडेगाव रोडवर छापा टाकून 05 गोवंशीय जनावरे आणि MH-02-FG-0978 क्रमांकाची बोलेरो पिकअप असा एकूण ₹9,25,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाईदरम्यान आरोपी नसीर बशीर कुरेशी, शेख कलीम कुरेशी आणि उमर कुरेशी यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली. ही मोहीम पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. उदय खंडेराय व त्यांच्या पथकाने पार पाडली. पोलीस अधीक्षकांनी या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पथकाचे कौतुक केले आहे....
error: Content is protected !!