A woman farmer committed suicide : कर्जापाई शेतकरी महिलेने आत्महत्या केल्याने तालुक्यात खळबळ
श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर तालुक्यातील मौजे मच्छिंद्र पार्डि दासू नाईक तांडा येथील कर्जबाजारी शेतकरी महिलेने राहत्या घरी सकाळी पाच वाजता विषारी औषध प्राशन केल्याने घरच्या मंडळींनी तिला वाइ बाजार आणि माहूर येथील रुग्णालयात दाखल केले असता तिची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवल्याची घटना दि १२ रोजी घडल्याने खळबळ उडाली आहे.
माहूर तालुक्यातील मौजे मच्छिंद्र पार्डि दासू नाईक तांडा येथील सुनिता परसराम राठोड वय 49 वर्षे यांची माहूर शिवारात गट नंबर 83 मध्ये पाच एकर कोरडवाहू शेती आहे त्यांचे वर भारतीय स्टेट बँक शाखा माहूरचे एक लाख रुपये कर्ज आहे. तर बचत गटांचे कर्ज असल्याने बँकेकडून व बचत गटाकडून जास्त प्रमाणात तगादा झाल्याने त्यांना सदरील आर्थिक व मानसिक त्रास सहन झाला नाही. त्यामुळे दि 12 रोजी सकाळी 5 वाजता राहत्या घरात त्यांनी विषारी औषध प्राशन केले सदरील घटना त्यांचे पती परसराम राठो...
