Suresh Palshikar : कायापालटाचा करिष्मा करत ३ हजारांहून अधिक जणांचे जीवन पालटणारे ॲड. दिलीप ठाकूर – सुरेश पळशीकर
नांदेड | कोणतीही प्रसिद्धी, अपेक्षा किंवा लाभ न पाहता गेल्या ६२ महिन्यांपासून रस्त्यावरील भिकारी, अपंग, मानसिक रुग्ण आणि विस्कळीत जीवन जगणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात "कायापालट" घडवणाऱ्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्याबद्दल उद्योजक सुरेश पळशीकर यांनी,"कायापालटाचा करिष्मा करत ३ हजारांहून अधिक जणांचे जीवन पालटणारे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर हे जगातील एकमेव व्यक्तिमत्व असावे,” असे गौरवोद्गार काढले.
यंदाच्या ६२व्या महिन्यातील उपक्रमात ५७ भ्रमिष्टांना शहरातील विविध ठिकाणांहून गोवर्धन घाट येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात आणून, त्यांच्या केस-दाढी कापून, स्नान घालून, स्वच्छ कपडे परिधान करून त्यांचा सन्मानपूर्वक कायापालट करण्यात आला. यावेळी प्रत्येकाला ₹१०० रोख बक्षीसही देण्यात आले. आतापर्यंत सुमारे ३००० पेक्षा जास्त भणंगांचे कायापालट या उपक्रमातून झाले आहेत.
भाजपा, लायन्स क्लब नांदेड सेंट्र...
