Adarsh Diwali Special Article ; आदर्श दिवाळी विशेष लेख – NNL
प्रस्तावना - 'तमसो मा ज्योतिर्गमय' या श्लोकाचा अर्थ : 'हे भगवंता ! आपण मला असत्याकडून सत्याकडे,अंधकारातून प्रकाशाकडे न्यावे 'अशी प्रार्थना आहे.प्रत्येक प्राणिमात्रांची धडपड प्रकाशाकडे जाण्याची असते. ज्या स्थितीत आहोत त्याच्या पुढील स्थितीत जाण्यासाठी, प्रगती करण्याकडे असते. अर्थात नकारात्मकते कडून सकारात्मकतेकडे जायचे असते. जीवनात सकारात्मकता शिकवणारा, प्रकाशाकडे वाटचाल करण्यास शिकवणारा सण म्हणजे दिवाळी.
सत्याच्या विजयाचे प्रतिक ! - प्रभू श्रीरामचंद्र हे 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून दिवाळीच्या दिवशी अयोध्येत परत आले. प्रभू श्रीरामचंद्राच्या आगमनाने प्रजेला खूप आनंद झाला. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या नगरीत घरोघरी तुपाचे दिवे लावून आनंद व्यक्त करण्यात आला. प्रभू श्रीराम सत्याचे मूर्तिमंत रूप असल्याने त्यांचा विजय म्हणजे सत्याचाच विजय होता. या विजयाचा उत्सव म्हणून आपण दिवाळी दीपोत्...
