Maratha reservation : काँग्रेसच्या बैठकीत मराठा समाजाने विचारली आरक्षणाविषयी भूमिका -NNL
नांदेड। भक्ती लॉन्स मंगल कार्यालय नांदेड येथे, काँग्रेस पक्षाची विभागीय स्तरीय बैठक होती. सदरील बैठकीला महाराष्ट्र प्रदेशाचे प्रभारी रमेश कथियाल, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,बाळासाहेब थोरात यांच्यासह डझनभर काँग्रेसचे नेते मंचावर उपस्थित असताना सकल मराठा समाजाचे आंदोलनकर्ते यांनी व्यासपीठाचा ताबा घेऊन मराठा आरक्षणाविषयी गुळमूळ भूमिका न घेता आपली व आपल्या पक्षाची ठोस भूमिका काय आहे ते तात्काळ कळवावी असा पवित्र घेतला, तेव्हा काही वेळासाठी मंचावर अचानक गोंधळ उडाला व काँग्रेसच्या कार्यकर्त्यापासून सर्वोच्च नेत्यापर्यंत सर्वांची तारांबळ उडाली पोलीस प्रशासनाने योग्य तो समतोल राखत परिस्थिती हाताळली.
आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी नांदेड येथे चार जिल्ह्याची विभागीय बैठक काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र प्रदेशाचे रमेश केतिनल यांच्या उपस्थितीत महारा...
