Kandahar Municipality : कंधार नगरपालिकेचा उपनगराध्यक्षपदी अब्दुल मन्नान चौधरी
कंधार (सचिन मोरे) कंधार नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अब्दुल मन्नान चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच दोन स्वीकृत सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे हनुमंत उर्फ स्वप्निल पाटील लुंगारे तर काँग्रेसचे निष्ठावंत माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद हमीद सुलेमान यांची बिनविरोध निवडीची घोषणा पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष शहाजी अरविंदराव नळगे यांनी जाहीर केली.
नगरपरिषद कंधारची प्रथम सर्वसाधारण सभा गुरुवार दि. १५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता नगराध्यक्ष शहाजी अरविंदराव नळगे यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरित्या पार पडली. सदर सभेचे आयोजन उपनगराध्यक्ष निवड तसेच दोन स्वीकृत सदस्य निवडीच्या अनुषंगाने करण्यात आले होते. उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे अब्दुल मन्नान मोहम्मद सरवर चौधरी यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने, पिठासीन अधिकारी तथा...
