Zilla Parishad school ; जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी लघुळ ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम
बिलोली l खाजगीकरणाच्या झपाट्यात पारंपरिक जिल्हा परिषद शाळा अस्तित्वासाठी संघर्ष करत असताना, बिलोली तालुक्यातील लघुळ ग्रामपंचायतीने घेतलेला एक निर्णय संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. वाढत्या इंग्रजी माध्यम शाळांच्या क्रेझमुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थ्यांचे प्रमाण टिकविण्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून लघुळ ग्रामपंचायतीने एक अभिनव आणि लोकाभिमुख निर्णय घेतला आहे.
गावातील जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा ऐतिहासिक ठराव ग्रामपंचायतीने नुकताच संमत केला आहे. हा निर्णय केवळ आर्थिक सवलतीपुरता मर्यादित नसून, शिक्षणाला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी घेतलेले सकारात्मक पाऊल आहे.
"शाळा वाचवण्यासाठी एकत्रित प्रयत्न"
सध्या ग्रामीण भागात अनेक जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांच्या कमतरतेमुळ...
