Navodaya Vidyalaya ; नवोदय विद्यालयात दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात
नांदेड | पीएम श्री.जवाहर नवोदय विद्यालय, शंकर नगर, नांदेड येथे १७ व १८ फेब्रुवारी २०२५ रोजी "वनस्पती वर्गीकरण, पर्यावरण आणि पर्यावरणीय शास्त्र" या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा अत्यंत उत्साहात संपन्न झाली. SEER भारत फाऊंडेशन आणि शरदचंद्र कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने तसेच जवाहर नवोदय विद्यालय, शंकर नगर, नांदेड यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे. हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. ८वी, ९वी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेषरित्या आयोजित या उपक्रमामध्ये पुष्पबंधांचे विविध प्रकार प्रत्यक्ष दाखवण्यात आले.विद्यार्थ्यांना परिसरात थेट निरीक्षण करून पर्यावरणविज्ञान व वनस्पतीशास्त्र याबद्दल सखोल ज्ञान मिळावे, यासाठी शालेय ...
