A test of loyalty in Marathwada : मराठवाड्यात निष्ठेची परीक्षा -NNL
मराठवाड्यासाठी यंदाची विधानसभा निवडणूक खूप वेगळी आहे . लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेची निवडणूक वेगवेगळ्या मुद्द्यावर लढविली जाते. तसे पाहिले तर मराठवाड्यासाठी महायुतीने भरभरून योजना दिल्या. त्या योजनांची उतराई करण्यासाठी मराठवाड्यातील मतदार महायुतीच्या बाजूने उभा राहतो की पुन्हा लोकसभेप्रमाणे महाविकास आघाडीच्या पारड्यात मते जातील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
प्रामुख्याने महायुती व महाविकास आघाडी या दोघांमध्ये राज्यात लढत होत आहे . प्रत्यक्षात मात्र मराठवाड्यात सहा पक्षाचे वेगवेगळे उमेदवार, बंडखोर तसेच इतर अपक्ष व अन्य छोट्या-मोठ्या पक्षांच्या उमेदवारांच्या लढती लक्षवेधक आहेत . लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपला म्हणावी तशी साथ मतदारांकडून मिळाली नाही. त्यावेळची परिस्थिती व सध्याच्या विधानसभा निवडणुकीतील परिस्थिती खूप वेगळी आहे. त्यामुळे विधानसभेत मराठवाडा कोणाच्या बाजूने उभे ...
