Sunday, June 28

Tag: A mountain of corruption in development works in Sarsam and Pota Bit; Demand

corruption in development works : सरसम व पोटा बिटमधील विकासकामांवर भ्रष्टाचाराचा डोंगर; दोषींवर कारवाईची मागणी

corruption in development works : सरसम व पोटा बिटमधील विकासकामांवर भ्रष्टाचाराचा डोंगर; दोषींवर कारवाईची मागणी

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर (अनिल मादसवार) सरसम (दूधड–वाळकेवाडी) व पोटा (सोनरी फाटा परिसर) या दोन्ही बिटमध्ये 2024-25 या कालावधीत करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये प्रचंड गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवून मजुरांमार्फत नव्हे तर थेट JCB मशीनद्वारे झाडे लावली तर काही ठिकाणी थेट दगडगोट्यामध्ये झाडे लावल्याचे आढळून आले आहे. झाडांमधील अंतर नियमावलीनुसार न ठेवता मनमानी पद्धतीने लागवड करण्यात आली असून, जाळी व दगडी बंधाऱ्यांवर आवश्यक संरक्षणात्मक जाळी बसविण्यात आलेली नाही. तक्रारदार राजकुमार दगडू पवणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, माती तळी निकृष्ट दर्जाचे असल्याने ती वाया गेली असून, जंगल परिसरात सध्या झाडांची अनधिकृत तोड सुरू आहे. या कामांमध्ये मजुरांचे हक्काचे पैसे रोखून ते संबंधित अधिकाऱ्यांनी JCB मालक व स्वतःच्या फायद्यासाठी वळविल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ...
error: Content is protected !!