ration of happiness : गौरी गणपती उत्सव संपला तरी आनंदाचा शिधा मिळेना; ऐन सणासुदीच्या दिवसात गोरगरीबांची थट्टा -NNL
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारकडून जनतेला आकर्षित करण्यासाठी विविध योजनांच्या घोषणाचा पाऊस पाडल्या जात आहे. परंतु, राज्य शासनाकडुन जाहीर करण्यात आलेल्या यातील बहुतांश योजनांची अमलबजावणी मात्र म्हणावे त्या प्रमाणात प्रभावी पणे व दिलेल्या मुदतीत होत नसल्यामुळे योजनेस पात्र लाभार्थ्यांची उपेक्षा भंग होत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे येत आहे.
केंद्र शासनाकडून सोयाबीन व कपाशीच्या हमी भावातील तफावत दुर करण्याच्या दृष्टीने राज्यातील शेतकऱ्याना प्रती हेक्टरी ५००० रुपये एवढी रक्कम देण्याचे मागील बऱ्याच दिवसा पूर्वी जाहीर करण्यात आले होते. यावर राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषीमंत्री यांनी या संदर्भात अनुदान वाटपाची डेडलाईन देखील जाहीर केली होती. त्यामुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे लक्ष या अनुदानाच्या रक्कमेकडे लागले होते. परंतु अद्य...
