Friday, June 26

Tag: A massive road blockade protest by the Farmers’ Sons’

protest by the Farmer : मुखेडमध्ये शेतकरी पुत्र संघर्ष समितीकडून सोमवारी भव्य रास्ता रोको आंदोलन

protest by the Farmer : मुखेडमध्ये शेतकरी पुत्र संघर्ष समितीकडून सोमवारी भव्य रास्ता रोको आंदोलन

कृषी, नांदेड
नांदेड (प्रतिनिधी) जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी पुत्र संघर्ष समितीकडून सोमवारी (दि. 06 ऑक्टोबर 2025) सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, तहसील कार्यालयासमोर भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. अतिवृष्टी व भीषण पुरामुळे मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेती उध्वस्त होऊन शेतकरी पूर्णतः खचला आहे. शासनाने केवळ हेक्टरी 8,500 रुपयांची मदत जाहीर केली असून, ही मदत अपुरी असल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन पुढील प्रमुख मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना सरसकट विना अट संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी. पंजाब राज्याप्रमाणे हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत देण्यात यावी. सर्व शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा मंजूर करण्यात यावा. पूरग्रस्त गावांचे माळीणच्या धर्तीवर पुनर्वसन व...
error: Content is protected !!