Sunday, June 28

Tag: A laborer was swept away

A laborer was swept away : पुराच्या पाण्यात नडव्याच्या पुलावरून मजूर वाहून गेला; झाडाचा आसरा घेत कसाबसा जीव वाचविला

A laborer was swept away : पुराच्या पाण्यात नडव्याच्या पुलावरून मजूर वाहून गेला; झाडाचा आसरा घेत कसाबसा जीव वाचविला

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर (अनिल मादसवार) सोमवारी रात्री विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे शहर व परिसरातील नाले तुडुंब भरून वाहू लागले. शहरांलगत असलेल्या नडव्याच्या पुलावरून दुचाकीवरून जात असताना विदर्भातील एका मजुराला पुराच्या लाटांनी वाहून नेले. दैव बलवत्तर म्हणून त्याने झाडाचा आधार घेत कसाबसा जीव वाचविला, पुराच्या पाण्याने दुचाकी वाहून गेल्याने शोध घेतला असता दोन किलोमीटर दूरवर पाण्यात दुचाकी सापडली आहे. रात्रभर त्याने झाडाचा आसरा घेऊन जीव वाचविला सकाळी पूर ओसरल्याने येथील गोदामाच्या बाजूने तो बाहेर पडला. हा प्रकार लक्षात येताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पीडिताची विचारपूस केली. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आरोप केला की, नडव्याच्या पुलाचे बांधकाम अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळेच अशा घटना घडत आहेत. थोडासा पाऊस झाला की येथे पाणी पुलावरून वाहून रस्ता बंद होतो. या मार्गावरून शालेय विद्य...
error: Content is protected !!