Dinesh Kawade : नांदेडच्या कलावंतानी मिळवली पुणेकरांची दाद
नांदेड| महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित 63 वी महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत नांदेडच्या स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था, नांदेड प्रस्तुत, सिने स्टार अॅक्टिंग अकॅडमी, नांदेड निर्मित व्हाईट पेपर (A great performance of the play white Paper) या नाटकाचे २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे उत्तम सादरीकरण झाले.
एक गाव आणि त्या गावातील जुना इतिहास पुन्हा नव्याने लिहिण्याचे काम गावातीलच प्रतिष्ठीत नागरिकाना सोपवण्यात येते...ज्यात प्रत्येक जाती धर्माच्या लोकांचा समावेश असतो. प्रत्येक जन हा इतिहास कसा आपल्या धर्माशी निगडीत आहे हे पटवून सांगण्याचे प्रयत्न करीत असतात त्यामुळे भाऊ बंधकीने राहणार्या लोकांमध्ये मत भिन्नता निर्माण होते. पुन्हा हि जागा एका राजाची असून हि जागा त्याचे खाजगी सौच्य कुब होते हे सिद्ध होते. त्...
