Sunday, May 31

Tag: A grand Shiv Jayanti celebration

Shiv Jayanti celebration : शिवरायांचा जयघोष, आतषबाजी आणि लेझीमच्या तालावर लोहत भव्य शिवजयंती उत्सव

Shiv Jayanti celebration : शिवरायांचा जयघोष, आतषबाजी आणि लेझीमच्या तालावर लोहत भव्य शिवजयंती उत्सव

नांदेड, महाराष्ट्र
लोहा| “छत्रपती शिवाजी महाराज की जय… एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर…” या घोषणांनी लोहा शहर दुमदुमले. टाळ-मृदंग, लेझीमच्या तालावर आणि आतषबाजीच्या रोषणाईत शिवप्रेमींनी उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. शहर भगव्या ध्वजांनी आणि आकर्षक सजावटीने नटले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही १९ फेब्रुवारी रोजी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढाकाराने भव्य-दिव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास नेत्रदीपक रोषणाई व आकर्षक सजावट करण्यात आली होती. बुधवारी रात्रीपासूनच शिवप्रेमींनी अभिवादनासाठी मोठी गर्दी केली होती. दुपारी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आमदार सुभाष साबणे, युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर, नगराध्यक्ष शरद पवार, सचिन पाटील चिखलीकर, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, उपनगराध्यक्ष करीम शेख, माजी उपनगर...
error: Content is protected !!