Agricultural exhibition : श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत भव्य कृषि प्रदर्शनाचे आयोजन
नांदेड| श्रीक्षेत्र माळेगांव यात्रा येथे कृषि विभाग जिल्हा परिषद नांदेडमार्फत भव्य कृषिप्रदर्शन, फळे, भाजीपाला व मसाला पिके प्रदर्शन व स्पर्धा तसेच सन 2025-26 यावर्षामध्ये कृषिक्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे सन 2025-26 चे 16 शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार कृषिनिष्ठ शेतकरी म्हणून साडीचोळी, शॉल, फेटा, मोमेन्टो देऊन करण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
यावर्षी कृषि विभाग, जिल्हा परिषद नांदेडमार्फत यात्रेच्या ठिकाणी कृषि प्रदर्शनचे आयोजन केले असून बियाणे, रासायनिक खते, किटकनाशक औषधी, विविध कृषि औजारे, ट्रॅक्टर, यंत्रे, सुक्ष्मसिंचन, कृषि विज्ञान केंद्रामार्फत मातीपरिक्षण प्रयोगशाळा, कृषि विद्यापीठ, कृषि विभाग महाराष्ट्र शासन, सेंद्रीय शेती, देशीवाण, किटकनाशके वापराबाबत मार्गदर्शन इत्यादीबाबतचे...
