fund handed over : एक कोटीचा धनादेश मुख्यमंत्र्यांना सुपूर्द
श्रीक्षेत्र माहूर l महाराष्ट्रात राज्यात पावसाळ्यात अतिवृष्टी पुराचे पाणी यासह इतर कारणांनी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते यासाठी शेतकऱ्यांना नागरिकांना मदत व्हावी म्हणून माहुर गडावरील श्री रेणुका देवी संस्थान कडून मुख्यमंत्री सहायता निधीत एक कोटीचा निधी देण्याची जाहीर करण्यात आले होते या अनुषंगाने रेणुका देवी संस्थानचे कार्यकारी मंडळ आणि विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी नागपूर येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन एक कोटीचा धनादेश दि 20 रोजी त्यांचे सुपूर्द केल्याने श्री रेणुका देवी संस्थानच्या कार्यकारी मंडळ विश्वस्त मंडळाचे अभिनंदन होत आहे
श्री रेणुकाची संस्थान मंदिरात आल्यानंतर भाविकांना सुविधा सुरक्षा मिळाव्यात भाविकांना आनंदात दर्शन घेता यावे यासाठी श्री रेणुका देवी संस्थान दिवसेंदिवस गडावर सुविधात वाढ करत आहे तसेच अनेक वेळा शाळा अंगणवाड्या यासह भाविकांना देण्यात...
