A case under POCSO was registered : सिरंजनीत एका गावगुंडावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी गजाआड
नांदेड| जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरंजनी येथील शाळेतून घरी जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी सिरंजनी येथील एका गावगुंडावर हिमायतनगर पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला गजाआड केलं आहे. या घटनेवरून महिलां - मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न आला ऐरणीवर आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या मौजे सिरंजनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीला शिकणारी आठ वर्षीय मुलगी सोमवारी दिनांक ३ मार्च रोजी शाळा सुटल्यानंतर घरी येत असताना धम्मपाल राजू येरेकार या गावगुंडाने तिला रस्त्यात अडवले. त्याने तिच्या अंगावर हात टाकून तिची पॅन्ट काढली आणि तिच्या पार्श्वभागावर हात फिरवत अश्लील चाळे करू लागला. अचानक झालेल्या या प्रका...
