किनवटच्या महसूल प्रशासनाची धडक कार्यवाही…दोन दिवसात गौणखनिजाचे 6 ट्रॅक्टर व 1 टिप्पर पकडले -NNL
किनवट, परमेश्वर पेशवे। किनवटच्या महसूल प्रशासनाने अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या विरोधात धडक मोहीम सुरू केली असून या मोहिमे अंतर्गत फिरत्या पथकाने 4 व 5 जून अशा दोन दिवसात वेगवेगळ्या ठिकाणाहून रेती मुरूम व दगडाची विनापरवाना वाहतूक करणारे 6 ट्रॅक्टर व एक टिप्पर जप्त करण्याची कार्यवाही केली आहे.
किनवट तालुक्यात अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या विरोधात महसूल प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून तहसील कार्यालयातील गौणखनिज विभागाच्या फिरत्या पथकाने 4 जून रोजी वेगवेगळ्या ठिकाणी रेती मुरूम व दगडाची विनापरवाना वाहतूक करणारे ट्रॅक्टर व टिप्पर पकडले आहेत.तालुक्यातील राजगड येथे दगड भरून वाहतूक करत असलेले 1टिप्पर व 2 ट्रॅक्टर फिरत्या पथकाच्या निदर्शनास आले.त्यांच्याकडे वाहतूक परवाना नसल्यामुळे दगड भरून असलेली तीनही वाहने ताब्यात घेऊन किनवट तहसील कार्यालयाच्या आवारात लावली आहेत.
जप्त केलेले दगड राजगड...
