Savargaon ; सावरगाव परिसरात दगडाने ठेचून 45 वर्षीय तरुणाची हत्या – NNL
किनवट, परमेश्वर पेशवे l किनवट तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या सावरगाव परिसरात दिनांक 15 रोजी सायंकाळी च्या मध्यरात्री एका 45 वर्षीय तरुणाची निर्घुण हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली. असून सदरील घटनेचा शोध इस्लापूर पोलीस घेत आहेत.
सावरगाव येथील ऑटो चालक सखाराम मारोती गायकवाड राहणार सावरगाव वय 45 वर्ष या तरुणांचा दिनांक 15 रोजी च्या मध्यरात्री सावरगाव येथील धाब्यावर काही मध्य धुंद अवस्थेत असलेल्या तरुणांशी भांडणाच्या स्वरूपातून वाद निर्माण झाला होता त्यातूनही या तरुणास दगडाने ठेचून मारून टाकण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सदरील हत्या कशामुळे झाली याचा शोध लागणे हा उत्सुकतेचा विषय बनला आहे.
इस्लापूर परिसरात गेल्या वर्षभरामध्ये डोंगरगाव ,दयाळ धानोरा, या गावांमधून गांजा तस्करी त्याचबरोबर परिसरात शिवनी इस्लापूर जलधरा या ठिकाणाहून होणारी गुटखा तस्करी सारख्या मोठ...
