हिमायतनगर। तालुक्यातील दुधड- वाळकेवाडी येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यानींना दुषित पाणी प्यायल्यामुळे उलटी, मळमळ, हिवताप, सर्दी, खोकला व पोटदुखी यासह अनेक आजाराची लागण झाली आहे. सात विद्याथ्यानींना अधिकचा त्रास होवु लागला असल्याने त्यांना उपचारांसाठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात रविवारी सायंकाळी 4 वाजता दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार गेल्या दोन तीन दिवसापासून सुरु असताना देखील संबंधित अधीक्षक, मुख्याध्यापक याकडे लक्ष देत नसल्याने आज या विद्यार्थिनींना हिमायतनगर येथे दाखल करण्यात आल्यासचे विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.
तालुक्यातील दुधड- वाळकेवाडी येथे निवासी शासकीय आदिवासी आश्रम शाळा आहे. या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी गेल्या काही दिवसांपासून आजारी अवस्थेत आहेत. दि.१४ रोजी कु. दुर्गा शिवाजी वागतकर वय १४ वर्ष, कु. सोनी माधव धनवे वय १५ वर्ष, कु.प्रियंका माधव माझळकर वय १३ वर्ष, कु. गायत्री रजनीकांत चव्हाण वय १५ वर्ष, कु. अंकिता काशिनाथ झाडे वय १४ वर्ष, कु. आरती भारत झाडे वय १६ वर्ष या सहा विद्यार्थिनींना अधिक प्रमाणात अस्वस्थता जाणवत असल्याने त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
या विद्यार्थ्यानीवर वैद्यकीय अधिकारी डाॅ. शिवशंकर बुरकूले हे उपचार करीत आहेत. यामध्ये एका विद्यार्थ्यीनीला अधिकचा त्रास जाणवत असल्याने ऑक्सिजन व निबुलायजर लावण्यात आले आहे. दरम्यान विद्यार्थिनींना झालेल्या आजारा बाबत डाॅक्टरांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पावसाळ्यात जवळपास ९०% आजार हे दुषित पाणी प्राष्रण पील्यामुळेच होतात. या विद्यार्थीनीना ही दुषित पाणी प्यायल्यामुळेच हे आजार निर्माण झाले असावेत असे सांगण्यात आले आहे. दरम्यान दुपारी विद्यार्थ्यांनिनी जेवण केलं होतं, त्यामुळे नक्की हा प्रकार विषबाधा किंवा दूषित पाणी यामुळे झाला की काय.. हे सांगणे कठीण आहे. येथील शासकीय आश्रम शाळेत मोठ्या प्रमाणात असुविधा असून, शासनाकडून आंध आदिवासी विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असतो. मात्र या सुविधा दिल्या जातात की नाही,,, दिल्या जात असेल तर असे प्रकार कसे घडतात हा संशोधनाचा विषय आहे.
परंतू येथील मुख्याध्यापक व व्यवस्थापकीय यंत्रणेकडून कामे बरोबर होत नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांच्या जिवीतासी खेळ चालू आहे. या ठिकाणी फिल्टर मशिन बंद असून, सार्वजनिक नळयोजनेद्वारे व बोर्डवर उपलब्ध पाणी हे शाळेत विद्यार्थ्यांना पिण्यासाठी वापरावे लागत असल्याने विद्याथ्यानींना अश्या स्वरूपाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर बाबीकडे किनवटचे प्रकल्प अधिकारी यांनी तात्काळ लक्ष पुरवून येथील विद्याथ्यानींच्या आजारास कारणीभूत ठरणाऱ्या यंत्रणेवर कारवाईचा बडगा उगारावा. अशी मागणी आदिवासी जनतेतून पुढे आली आहे. या संदर्भांत मुख्याध्यापक प्रल्हाद चाने यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले कि, आम्ही मुलींना फिल्टरचे पाणी देतो. मात्र विद्यार्थिनी आम्हाला सभेचे पाणी पिण्यासाठी मिळत असल्याचे सांगितल्याने मुख्याध्यापकांचा या दूषित पाणी प्रकारावर पांघरून घालण्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या प्रकारामुळे आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांची तपासणी कैम्प लावून करून घेणे आवश्यक आहे असे सुजाण नागरीकांनी बोलून दाखवले.
यापैकी एक विद्यार्थिनी दुर्गा वागतकर या मुलीस अस्थमाचा त्रास असल्याने तिला निबुलायजर लावून उपचार करण्यात आले असून, 24 घंटे रुग्णालयात भरती ठेऊन उपचार केले जाते आहेत अशी माहिती वैद्यकीय अधिकारी बुरकुले यांनी सांगितले, या विद्यार्थ्यांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात कार्यरत आसलेल्या सर्व आरोग्य सेवक कविता नागमोड, गजानन डुकरे, संतोष नारखेडे, रविकुमार माने, दिनेश राठोड, शेख मुबिन, यांनी धावाधाव करून सहकार्य केले आहे.