नवीन नांदेड l पुण्यश्लोक अहिल्यादेवी सार्वजनिक वाचनालय होळकरनगर सिडको नांदेड येथे मराठवाडा मुक्ती दिन,पेरियार रामस्वामी नायकर,भिमाबाई होळकर व क्रांतीवीर उमाजी नाईक यांची संयुक्त जयंती निमित्ताने पुरूष वाचक मेळावा कार्यक्रम वाचनालय संस्थेचे संस्थापक गोविंदराम शूरनर यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून काशीनाथ नाना शेवते,अश्रुबा कोळेकर,परमेश्वर पुजारी,डॉ.श्रीराम राठोड ,प्रा.भगवानराव मुंढे उपस्थित होते.अध्यक्षिय भाषण करताना गोविंदराम म्हणाले,भारतात इंग्रजाना भारत सोडून जावे म्हणून सन १८११ ते १८१९ काळात विरांगणा भिमाबाई होळकर यांनी इंग्रजांशी झुंज देवून सळोकी पळो करून सोडले होते .पण भिमाबाई इंग्रजाना शरण गेली नाही , तीचा मृत्यू कैदेतच झाला .खर्या अर्थाने स्वातंत्र्या साठी लढणारी ती भारतीय पहिली विरांगणा ठरते. परंतू भिमाबाई होळकर आजही उपेक्षीत विरगंणा आहे.
पेरियार रामस्वामीनी उपेक्षित बहुजना साठी इंग्रज बरोबर तसेच कांग्रेस बरोबर संघर्ष करून दक्षिण भारतात तामिळनाडू,केरळच्या जनतेला खरी लोकशाही मिळवून दिली.म्हणुनच तेथे पिड्यान पिड्या उपेक्षित राहिलेल्या समाजाला न्याय मिळाला आहे.यांच्या जन्मदिनी १७ सप्टेंबरला मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. या महापुरूषाचे विचारांची शिदोरी उपेक्षित समाजांनी घेतले तर समाज सत्ताधारी बनेल त्या साठी वाचनाची गरज आहे असे प्रतिपादन गोविंदराम शूरनर यांनी केले,सर्व प्रमुख पाहुण्यांनी वाचन संस्कृती वर विचार मांडले.
या कार्यक्रमाला रघुनाथ डुबुकवाड, सुधाकर देवकते,मोहन मुदनकर , बाबुराव भिंगे,दिपक कोटलवार, महाजन तुपेकर, चंद्रकांत रोडे,ज्योती कसनकर,ममता पतंगे, वनिता राठोड,गणेश राठोड,सुर्यकांत गुंडाळे, सावित्रीबाई शूरनर,सविताताई हेळगीरे, शितलताई शिंदे, गौरी देवकते व इतर वाचक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक ग्रंथपाल मदनेश्वरी देवकाते यांनी आभार मानले.