मुंबई| स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एसएव्हीडब्ल्यूआयपीएल) ने महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये ७० हजारपेक्षा जास्त झाडे लावून एक मोठा मैलाचा दगड पार केला आहे तसेच पर्यावरण पुनर्संचयन करण्याची या समूहाची बांधिलकी अधोरेखित केली आहे. आपल्या छत्रपती संभाजीनगर कार उत्पादन प्लांटजवळ ग्रीन फ्युचर पार्क येथे 1 लाखावे झाड लावण्याची सिद्धी देखील त्यांनी अलीकडेच प्राप्त केली आहे. ही झाडे शेंद्रा औद्योगिक क्षेत्राला ऑक्सिजन समृद्ध वातावरण प्रदान करतील.
एसएव्हीडब्ल्यूआयपीएलचे वृक्षारोपण हा त्यांच्या अनेक हरित प्रकल्पांना सामावून घेणाऱ्या एका व्यापक शाश्वतता अजेंडाचा एक भाग आहे. या समूहाने आपले कार्बन फुटप्रिंट कमी करण्यात लक्षणीय प्रगती केली आहे आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर प्लांटचे संपूर्ण डीकार्बनाईझेशन साध्य केले आहे म्हणजेच प्लांटचे संचालन १००% हरित ऊर्जेवर केले जाते. शिवाय, एसएव्हीडब्ल्यूआयपीएल ने आपल्या चाकण सुविधेच्या ठिकाणी १८.५ एमडब्ल्यूपीचे रूफटॉप सोलार पॉवर स्थापित केले आहे जे कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन सुमारे ३०% ने कमी करते.
आपली पर्यावरण वचनबद्धता दाखवून देत एसएव्हीडब्ल्यूआयपीएलने अलिबाग येथील १०० हेक्टरचे खराब झालेले मॅनग्रोव्ह जंगल पुनर्संचयित केले आहे, ५,८०,००० पेक्षा जास्त झाडे लावली आहेत व अशाप्रकारे, महत्त्वपूर्ण समुद्रकिनारा इकोसिस्टमचे पुनरुज्जीवन केले आहे. या समूहाने महाराष्ट्राच्या दुष्काळी भागांमध्ये ६०० मिलियन लीटर पेक्षा जास्त क्षमतेचे पावसाच्या पाण्याचे संचयन करून आपले शाश्वततेचे प्रयत्न आणखी वाढवले आहेत. आणि अशाप्रकरे, आपल्या मर्यादा पार करून शाश्वत जल व्यवस्थापनाप्रति असलेली त्यांची निष्ठा दाखवून दिली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये, एसएव्हीडब्ल्यूआयपीएलने छत्रपती संभाजी नगर आणि पुणे तसेच महाराष्ट्रातील इतर काही स्थानिक क्षेत्रांत निरंतर पर्यावरण संचयन प्रकल्पांना हातभार लावला आहे. यापैकी काही महत्त्वाचे प्रकल्प आहेत- ऑक्सिजन पार्कमध्ये २५०००, ग्रीन हब येथे ११,५०० आणि अलीकडेच विकसित केलेल्या ग्रीन फ्युचर पार्क येथे ६३,५०० झाडे लावणे ज्यामधून त्यांचे भरघोस प्रयत्न दिसून येतात.
या उपक्रमांतर्गत लावलेली झाडे ५-७ वर्षांची झाल्यानंतर कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन कमी करण्यावर त्यांचा उल्लेखनीय प्रभाव पडेल अशी आशा आहे. पर्यावरणीय लाभांव्यतिरिक्त हे प्रकल्प स्थानिक तापमान कमी करण्यात, इकोसिस्टमचे पुनर्संचयन करण्यात आणि पृथ्वीवरील हरित आवरण वाढवण्यात मोठे योगदान देतात. बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीने समृद्ध असलेले हे प्रकल्प या समूहाच्या ‘गोटूझीरो’ या पर्यावरण मिशन विधानास अनुसरतात.