उस्माननगर, माणिक भिसे l कळका ता.कंधार येथील सचिन बाजीराव गायकवाड यांनी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेत msc Bio Tek मधये पहिला क्रमांक पटकावला आहे.कळका येथील रहिवासी संपादक बाजीराव पाटील गायकवाड यांचे सुपुत्र सचिन पाटील हे तीन जिल्ह्यांतून पहिले आले आहेत.


त्यांची काही दिवसांपूर्वी सिरम इन्स्टिट्यूट पुणे येथे नियुक्ती झाली असून त्यांनी पुन्हा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेत पहिला येण्याचा मान मिळवून एमजीएम कॉलेज नांदेड तसेच बाजीराव पाटील यांचे नाव केले आहे. सिरम इन्स्टिट्यूट च्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत महाराष्ट्रातून फक्त सात विद्यार्थी पास झाले आहेत.त्यामध्ये सचिन पाटील यांनी यश मिळविले आहे.


त्याच्या या यशाबद्दल एमजीएम कॉलेजचे संस्थापक मा.आ.कमलकिशोर कदम,आ.प्रतापराव पाटील चिखलीकर,आ.आनंदराव पाटील बोंढारकर , चेअरमन मारोतराव पाटील कवळे गुरुजी, न्यायमूर्ती मारोतराव पाटील गायकवाड,प्राचार्य मारोतीराव पाटील घोरबांड, अँड.विनायकराव कदम, इंजि.अशोकराव पाटील डावकोरे,सरपंच संतोष पाटील जाधव, सरपंच गौतम बनसोडे शंभरगांवकर, बालाजी पाटील जाधव, पत्रकार बालाजी शिंदे.


देविदास पाटील वडवळे, सरपंच राजीव पाटील गायकवाड,संगम पाटील गायकवाड,गिरमाजी पाटील गायकवाड, कैलास पाटील गायकवाड,प्रा.बालाजी पाटील गायकवाड, मानसिंग पाटील गायकवाड,माजी सरपंच गोविंदराव पाटील गायकवाड, पंडित जाधव, सचिन गोविंद गायकवाड, आकाश गादेकर, डॉ नागोराव गादेकर ,कळका, कलंबर, हडको येथिल नागरिकांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.एका महीन्यात दोन यश मिळवून संपादक बाजीराव पाटील गायकवाड यांचे व कळका गावाचे नाव सचिन पाटील यांनी केले आहे.



