Roshan Halde elected as Bhim Prahar Nanded City President नांदेड| भीम प्रहारच्या नांदेड शहराध्यक्ष रोशन हळदे, उपाध्यक्ष कैलास भोकरे तर सचिवपदी जयदीप पैठणे यांची निवड भीम प्रहारचे संस्थापक अध्यक्ष जयकुमार डोईबळे यांनी केली.


भीम प्रहारचे जिल्हाध्यक्ष दीपक पवळे यांच्या हस्ते शहर कार्यकारणीचे नियुक्ती पत्र नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना आज राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त म.फुले स्मारक,नांदेड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.


या सोहळ्यास प्रमुख मार्गदर्शक भीम योद्धा श्याम निलंगेकर मा.रामराव मुनेश्वर,रिपाईचे युवा नेते सूरज खिराडे,भीम प्रहारचे जिल्हा सचिव सम्यक खोसले,रोहन कहाळेकर,यांनी मार्गदर्शन केले.


यावेळी आकाश शिंदे,शिवम रोडगे,व्यंकटेश देवणे,सिद्धार्थ जाधव,धर्मा वाघमारे,सुरेश भांडवले,रोहित ठाकूर,ओंकार मारलवाड,अर्जुन राजपूत, बबलू गायकवाड,अक्षय वाडीकर,दुर्गेश घोंगडे,अनुप भालेराव,रोहित कांबळे,मंगेश तोगरे यांची उपस्थित होती.



