नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सहयोग सेवाभावी कॉलेज ऑफ एज्युकेशन विष्णुपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानतीर्थ-२०२४’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभ संपन्न.
या युवक महोत्सवामध्ये लातूर येथील दयानंद महाविद्यालय यांनी सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. तर नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाने सर्वसाधारण उपविजेतेपद प्राप्त केले. नृत्यऋषी दिवंगत ऋषिकेश देशमुख विजेता संघ फिरते चषक या कालाप्रकारामध्ये लातूर येथील जयक्रांती महाविद्यालय यांनी पारितोषिक प्राप्त केले. शोभायात्रा या कलाप्रकारामध्ये नांदेड येथील इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी प्रथम, तर द्वितीय (विभागून) कंधार येथील शिवाजी कॉलेज ऑफ आर्ट्स कॉम अँड सायन्स आणि शंकर नगर येथील मधुकरराव बापूराव पाटील महाविद्यालय यांना पारितोषिक देण्यात आले.
तृतीय पारितोषिक (विभागवून) विष्णुपुरी येथील जीएसपीएम चे ग्रामीण विज्ञान व्यावसायिक महाविद्यालय आणि जळकोट येथील संभाजीराव केंद्रे महाविद्यालय यांना प्राप्त झाले. उत्कृष्ट स्त्री अभिनय या कलाप्रकारांमध्ये प्रथम पुरस्कार दयानंद कला महाविद्यालय बार्शी येथील तनुजा शिंदे यांनी पटकावले. द्वितीय पारितोषिक लातूर येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या आरती सांगावे यांना मिळाले. तर तृतीय पारितोषिक (विभागून) नांदेड येथील विष्णुपुरी येथील इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसीच्या आर्या कुलकर्णी आणि उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या करुणा भदाडे यांना देण्यात आले. उत्कृष्ट पुरुष अभिनय या कालाप्रकारामध्ये लातूर येथील दयानंद लॉ कॉलेज महाविद्यालयाच्या सोहेफ सय्यद प्रथम, लातूर निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या रत्नशील सोनकांबळे द्वितीय, मुखेड येथील शिवप्रसाद कॉलेज ऑफ फार्मसी चा विद्यार्थी विकास गोरे यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले.
उत्कृष्ट दिग्दर्शक या कलाप्रकारमध्ये लातूर बार्शी येथील दयानंद कला महाविद्यालयातील साहिल धोंडगे प्रथम, नांदेड येथील पीपल्स कॉलेज चा साहिल धोंगडे द्वितीय, तर तृतीय पुरस्कार नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या अदिती केंद्रे यांनी प्राप्त केले. आदिवासी नृत्य (सांघिक) या कला प्रकारामध्ये नांदेड येथील प्रतिभा निकेतन महाविद्यालय प्रथम, लातूर येथील चेन्नबबसवेश्वर फार्मसी महाविद्यालय द्वितीय, तर नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयांनी तृतीय क्रमांक पटकावला. शास्त्रीय नृत्य (वैयक्तिक) या कलाप्रकारांमध्ये लातूर येथील दयानंद कला महाविद्यालय बार्शी प्रथम, जय क्रांती कला महाविद्यालय द्वितीय तर नांदेड येथील यशवंत महाविद्यालय तृतीय असे पारितोषिक प्राप्त केले.
लोकनृत्य (सांघिक) या कला प्रकारांमध्ये लातूर येथील जय क्रांती कला महाविद्यालय प्रथम, दयानंद वाणिज्य महाविद्यालय द्वितीय (विभागून) आणि लातूर येथील राजश्री शाहू महाविद्यालय यांना देण्यात आले. तर तृतीय लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालय विभागून आणि दयानंद सायन्स कॉलेज बार्शी लातूर यांना देण्यात आले. नक्कल या कलाप्रकारांमध्ये लातूर बार्शी येथील दयानंद कला महाविद्यालय प्रथम, दयानंद वाणिज्य महाविद्यालय बार्शी द्वितीय, तर तृतीय (विभागून) लातूर येथील जय क्रांती महाविद्यालय आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरास प्राप्त झाले. मूक अभिनय या कला प्रकारामध्ये नांदेड येथील नेताजी सुभाष चंद्र बोस महाविद्यालय प्रथम, द्वितीय (विभागून) नांदेड येथील एमजीएम कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड आयटी आणि लातूर येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालय यांना देण्यात आले. तृतीय (विभागून) लातूर येथील चन्नबसवेश्वर फार्मसी कॉलेज आणि दयानंद कला महाविद्यालय बार्शी यांना देण्यात आले. विडंबन या कालाप्रकारामध्ये लातूर येथील दयानंद सायन्स कॉलेज प्रथम, तर दयानंद कला महाविद्यालय द्वितीय, तृतीय (विभागून) लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालय आणि नांदेड येथील एमजीएम ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड आयटी यांना प्राप्त झाले.
उत्कृष्ट एकांकिका या कलापुरकरांमध्ये लातूर येथील दयानंद कला महाविद्यालय प्रथम, द्वितीय (विभागून) दयानंद वाणिज्य महाविद्यालय बार्शी आणि नांदेड येथील पीपल्स कॉलेज यांना प्रदान करण्यात आले. तृतीय (विभागून) नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय आणि एमजीएम कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड आयटी यांना देण्यात आले. जलसा या कलाप्रकारामध्ये लातूर अहमदनगर येथील महात्मा गांधी महाविद्यालय प्रथम, द्वितीय (विभागून) लातूर येथील दयानंद कॉलेज ऑफ लॉ आणि परभणी येथील शिवाजी कॉलेज यांना विभागून देण्यात आले. तृतीय पारितोषिक (विभागून) कंधार येथील शिवाजी कॉलेज ऑफ आर्ट कॉम अँड सायन्स आणि वसमत येथील बहिरजी स्मारक महाविद्यालय यांना देण्यात आले.
फोक ऑर्केष्ट्रा (लोक संगीत) या कलाप्रकारामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसर प्रथम, लातूर येथील दयानंद महाविद्यालय बार्शी द्वितीय, तर लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालय यांनी तृतीय पारितोषिक पटकावले. लावणी या कलाप्रकारामध्ये लातूर येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालय बार्शी प्रथम, तर द्वितीय (विभागून) दयानंद कला महाविद्यालय बार्शी आणि परभणी येथील शारदा कला व विज्ञान महाविद्यालय यांना देण्यात आले. तृतीय (विभागून) लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालय आणि लातूर येथील जय क्रांती कला महाविद्यालय यांना देण्यात आले.
पोवाडा या कलाप्रकारामध्ये नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलेज प्रथम, यशवंत महाविद्यालय द्वितीय, तृतीय (विभागून) कंधार येथील शिवाजी कॉलेज ऑफ आर्टस कॉम अँड सायन्स आणि स्वा.रा.ती.म. विद्यापीठ परिसर यांना देण्यात आला. कव्वाली या कलाप्रकारामध्ये दयानंद कला महाविद्यालय बार्शी प्रथम, दयानंद कॉलेज ऑफ लॉ द्वितीय, तर तृतीय (विभागून) स्वा.रा.ती.म. विद्यापीठ परिसर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय यांना देण्यात आले.
समूह गायन- भारतीय या कालाप्रकारामध्ये स्वा.रा.ती.म.विद्यापीठ परिसर प्रथम, दयानंद सायन्स कॉलेज बार्शी द्वितीय, तृतीय (विभागून) वसमत येथील श्री. शिवाजी कॉलेज आणि लातूर येथील राजेश्री शाहू महाविद्यालय यांना देण्यात आला. सुगम गायन- पाश्चात्य या कलाप्रकारांमध्ये लातूर येथील दयानंद कला महाविद्यालय बार्शी प्रथम, नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय द्वितीय, लातूर येथील राजेश्री शाहू महाविद्यालय तृतीय क्रमांक पटकावला. सुगम गायन-भारतीय यामध्ये दयानंद कला महाविद्यालय बार्शी प्रथम, यशवंत कॉलेज नांदेड द्वितीय, तृतीय नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलेज यांना देण्यात आला. शास्त्रीय सुरवाद्य या कलाप्रकारांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलेज प्रथम, स्वा.रा.ती.म.विद्यापीठ परिसर द्वितीय, परभणी येथील श्री शिवाजी कॉलेज तृतीय यांना देण्यात आला.
शास्त्रीय तालवाद्य या कलाप्रकारांमध्ये स्वा.रा.ती.म.विद्यापीठ परिसर प्रथम, द्वितीय (विभागून) कंधार येथील शिवाजी कॉलेज ऑफ आर्टस कॉम अँड सायन्स आणि नायगाव येथील शरदचंद्र कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यांना देण्यात आला. तृतीय (विभागून) नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलेज आणि श्री शिवाजी कॉलेज वसमत यांनी प्राप्त केले. शास्त्रीय गायन श्री शिवाजी कॉलेज वसमत प्रथम, दयानंद कला कॉलेज बार्शी द्वितीय, तृतीय (विभागून) राजेश्री शाहू महाविद्यालय लातूर आणि स्वा.रा.ती.म. विद्यापीठ परिसर यांना देण्यात आला. कथाकथन या कालाप्रकारामध्ये लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालय प्रथम, वसमत येथील श्री शिवाजी कॉलेज द्वितीय, बिलोली शंकर नगर येथील मधुकरराव बापूराव पाटील महाविद्यालय तृतीय पारितोषिक मिळाले. वक्तृत्व या कालाप्रकारामध्ये स्वा.रा.ती.म. विद्यापीठ परिसर प्रथम, एमजीएम कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड आयटी द्वितीय, तृतीय (विभागून) श्री शिवाजी विधी महाविद्यालय आणि शिवाजी कॉलेज ऑफ आर्ट कॉम अँड सायन्स यांनी पटकावले.
वादविवाद या कालाप्रकारामध्ये स्वा.रा.ती.म. विद्यापीठ परिसर प्रथम, श्री शिवाजी कॉलेज वसमत द्वितीय, दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी बार्शी तृतीय पारितोषिक प्राप्त केले.मेहंदी या कलाप्रकारामध्ये लातूर येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालय बार्शी प्रथम, नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय द्वितीय, अर्धापूर येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर यांनी यश संपादन केले.कलात्मक जुळवणी (इन्स्टॉलेशन) या कलाप्रकारांमध्ये लातूर येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालय बार्शी प्रथम, उमरी येथील कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर द्वितीय, नांदेड येथील एमजीएम कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड आयटी यांनी पारितोषिक प्राप्त केले.स्थळ छायाचित्रण या कालाप्रकारामध्ये लातूर येथील दयानंद कला महाविद्यालय बार्शी प्रथम, दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालय बार्शी द्वितीय, दयानंद सायन्स कॉलेज बार्शी तृतीय यांनी पारितोषिक प्राप्त केले.रांगोळी या कलाप्रकारामध्ये लातूर येथील महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा प्रथम, दयानंद वाणिज्य महाविद्यालय बार्शी द्वितीय, नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय यांना तृतीय क्रमांक मिळाला.व्यंगचित्रकला या कलाप्रकारांमध्ये वसमत येथील श्री शिवाजी विधी महाविद्यालय प्रथम, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय द्वितीय, दयानंद वाणिज्य महाविद्यालय कॉलेज बार्शी तृतीय पारितोषिक प्राप्त केले.
मृदमुर्तीकला या कलाप्रकारामध्ये लातूर येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालय बार्शी प्रथम, नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय यांना द्वितीय, वसंत येथील बहिरजी महाविद्यालय तृतीय क्रमाकांचे पारितोषिक प्राप्त केले. पोस्टर पेंटिंग या कलाप्रकारामध्ये दयानंद कला महाविद्यालय कॉलेज बार्शी प्रथम, पीपल्स कॉलेज नांदेड द्वितीय, नेताजी सुभाषचंद्र बोस तृतीय क्रमाकांचे पारितोषिक प्राप्त केले. कोलाज या कलाप्रकारामध्ये स्वा.रा.ती.म. विद्यापीठ परिसर प्रथम, पीपल्स कॉलेज नांदेड द्वितीय, दयानंद वाणिज्य महाविद्यालय बार्शी तृतीय पारितोषिक प्राप्त केले. चित्रकला या कलाप्रकारामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस प्रथम, दयानंद कला महाविद्यालय कॉलेज बार्शी द्वितीय, लातूर येथील दयानंद कॉलेज ऑफ लॉ महाविद्यालय कॉलेज तृतीय पारितोषिक प्राप्त केले.