नांदेड| आज दिनांक 20 आक्टोंबर 2024 रोजी नांदेड परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यात अवैध दारू व विक्री विरोधात मासरेडचे आयोजन करण्यात आले होते. सदर कारवाई दरम्यान, परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या चारही जिल्ह्यातील 5 अपर पोलीस अधीक्षक, 16 पोलीस उपअधीक्षक यांचेसह 168 अधिकारी व सुमारे 546 पोलिस अंमलदारांनी मोहिमेत सहभाग घेतला होता.
नांदेडचे पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार, परभणीचे पोलीस अधीक्षक श्री रविंद्र सिंह परदेशी, लातूरचे पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे तर हिंगोली चे पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे यांनी आपापल्या जिल्ह्यात सदर कारवाईवर देखरेख करत संबंधितांकडून भरीव कामगिरी करून घेतली. सदर कारवाई दरम्यान, करण्यात आलेल्या कार्यवाहीची जिल्हानिहाय माहिती खालील प्रमाणे :
परिक्षेत्रातील अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी सदरची मोहीम सुरू राहील. नागरिकांनी आपापल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती संबंधित पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक, श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.