‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये ‘वृक्षोत्सव पंधरवाडा’ निमित्त वृक्ष लागवड – NNL

0

नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना व उद्यान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १० जून ते २४ जून या कालावधीमध्ये वृक्षोत्सव पंधरवाडा निमित्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते विद्यापीठ परिसरात वड, कृष्णवड, पिंपळ पिंप्रन, उंबर, कडुलिंब, अर्जुन, नागकेशर, खैर, रुद्राक्ष, रिटा, हिरडा, बेहडा, आपटा, नारळ, आवळा, अंबा, जांभूळ, बोर, फणस, बकुळ, बेल, पळस, पारिजात इ. विविध वृक्षाच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली.

यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, व्यवस्थापन परिषद सदस्य इंजिनिअर नारायण चौधरी, वित्त व लेखाधिकारी मोहमद शकील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर, उपकुलसचिव हुशारसिंग साबळे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सहाय्यक कुलसचिव रामदास पेदेवाड, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, उद्धव हंबर्डे, पांडुरंग सूर्यवंशी, संभाजी धनमने, तुकाराम हंबर्डे, अजमेर बिडला तसेच संकुलातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here