हिमायतनगर| राज्याचे वन मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त हिमायतनगर उमरखेड रोडवर असलेल्या राष्ट्रसाधना पब्लिक स्कूल परिसरात आर्यवैश्य समाज बांधवाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून वृक्षारोपण करण्यात आले.
दि. ३० मंगळवारी राज्यांचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस राज्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत असून, हिमायतनगर शहरातील राष्ट्र साधना पब्लिक स्कूल मध्येही आर्यवैश्य समाजांच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी श्याम रायेवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री रायेवार म्हणाले की, आर्यवैश्य समाज इतर समाजाला दिशा देण्याचे काम सातत्यानं करीत आला आहे.
आणी म्हणून यापुढेही आपण समाज बांधवांनी राज्याचे वन मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने संकल्प करावा. नुसती वृक्षलागवड करून चालणार नाही, तर त्याचे संगोपन ही तितकेच महत्त्वाचे असते. वृक्षलागवडी बरोबर संगोपन ही तितक्याच काळजीने करावे. असे अवाहन श्री रायेवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रास्ताविक कमलाकर दिक्कतवार यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांची उपस्थिती होती. तर आर्यवैश्य समाजाचे अध्यक्ष सुरेश अप्पा पळशिकर, श्याम मारूडवार, प्रवीण जन्नावार, श्यामजी रायेवार, पांडुआप्पा तुप्तेवार, प्रमोद तुप्तेवार, रमेश पळशीकर, रवींद्र दमकोंडवार, राजू चालमेलवार,अमोल पेन्शनवार, किशोर रायेवार, रवींद्र संगणवार, संतोष रेखावार, चिंतावार, महेश मारूडवार, मुन्ना मारुडवार, कृष्णा उत्तरवार, आदींसह राष्ट्रसाधना पब्लिक स्कुलचे शिक्षा, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.