नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील औषधनिर्माणशास्त्र संकुलामध्ये पीएम उषा (PM-USHA) योजनेअंतर्गत दि.२१ ते २६ ऑक्टोबर दरम्यान ‘कम्प्युटर- एडेड ड्रग डिझायनिंग’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेमध्ये नवीन औषध संशोधनाबद्दल माहिती आणि त्यासाठी तंत्रज्ञान वापराचे कौशल्य व ज्ञान इत्यादिंचा अंतर्भाव असणार आहे. या कार्यशाळेमध्ये पदव्यूत्तर, संशोधक विद्यार्थी आणि विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्राध्यापक सहभागी होऊ शकतात. या कार्यशाळेमध्ये बायोविया डिस्कव्हरी सॉफ्टवेअरचा परिचय, डॉकिंग, वर्च्युअल स्क्रीनिंग, एडीएमइटी आणि टीओपीकेएटी, थ्रीडी क़्युएसएआर, फोर्स फिल्ड आणि मिनीमायझेशन, मॉलिक्युलर डायनॅमिक्स सिम्युलेशन यासारख्या विषयावर सखोल चर्चा होणार आहे.
या कार्यशाळेचे समन्वयक डॉ. एस. आर. बुटले असून कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. एस. एस. पेकमवार, डॉ. शैलेश वाढेर, डॉ. एस. जी. गट्टानी, डॉ. शशिकांत ढवळे, डॉ. शैलेश पटवेकर, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. आर.एस. मून, डॉ. टी.एम. कल्याणकर, डॉ. घोळवे, डॉ. कराळे, मनुरे, शेळके, कदम, कल्याणकर, मोरे, माने, चौधरी, अळणे, मस्के यांच्यासह संकुलातील इतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.