नांदेड| नांदेड पाटबंधारे विभाग दक्षिण येथील कर्मचार्यांचे दोन महिन्यांपासून पगार झाले नसल्यामुळे संबंधित विभागाचे कर्मचारी हैराण झाले असून संबंधित कर्मचार्यांचे पगार त्वरित करण्याची मागणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा अन्याय प्रतिकार दलाचे संस्थापक सिध्दार्थ तलवारे यांनी नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंत्यांकडे केली आहे.
शासन निर्णयानुसार बॅक खात्यात आधारकार्ड अथवा पॅनकार्ड जोडले नसल्यास पगाराची वीस टक्के रक्कम थांबवून पगार करणे अपेक्षित होते तथापि नांदेड पाटबंधारे विभाग दक्षिण च्या कार्यकारी अभियंत्यांनी कर्मचार्यांचे मे व जून महिन्यातील वेतन अदा करण्यासाठी कसलीच कार्यवाही केली नाही. परिणामी कर्मचारी आर्थिक अडचणीत आले आहेत.
अनेक कर्मचार्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक कार्यासाठी लागणारे हप्ते व विविध प्रकारचे हप्ते थकले आहेत. या संदर्भात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सिध्दार्थ तलवारे यांनी अधीक्षक अभियंत्यांकडे एक निवेदन देऊन संबंधित कर्मचार्यांचे पगार त्वरित करण्याची मागणी केली आहे.