हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाण नांदेड द्वारा आयोजित एक दिवसीय नववी बौद्ध धम्म परिषद सोनारीफाटा तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड येथे दिनांक 29 मार्च 2026 रोजी आयोजीत करण्यात आली असून या बौद्ध धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष म्हणून नगरपंचायत हिमायतनगर चे लोकानियुक्त नगराध्यक्ष शेख रफिक भाई शेख महबूब यांची एकमताने निवड एक दिवशीय नववी बौद्ध धम्म परिषद संयोजन अध्यक्ष त्रिरत्नकुमार मा.भवरे कामारीकर गणपत नाचारे जवळगावकर रमेश सरपे लक्ष्मणराव मा .भवरे यांच्या स्वाक्षरीनिशी स्वागताध्यक्ष पदाचे संमतीपत्र दिले आहे.


यावेळी काँग्रेस पक्षाचे हिमायतनगर तालुका अध्यक्ष गजानन सूर्यवंशी सर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्दन ताडेवाड माजी नगराध्यक्ष अखिलभाई सुभाषदादा दारवंडे बौद्ध धम्म परिषदेचे निमंत्रक पत्रकार अनिल भाऊ मादसवार आशोक अनगुलवार सोपान बोंपीलवार काँग्रेस पक्षाचे हिमायतनगर शहराध्यक्ष संजयभाऊ माने पत्रकार कानबा पोपुलवार असाद मौलाना स.अ.मनानभाई पत्रकार संजय कवडे विजय वाठोरे अँड. ज्ञानेश्वर पंदलवाड गोविंद गोडसेलवार गणपत गायकवाड पत्रकार दिलीप शिंदे पत्रकार नागेशभाऊ शिंदे शिवाजी डोखळे परमेश्वर वालेगावकर आदींच्या उपस्थितीत देण्यात आले याप्रसंगी नगराध्यक्ष शेख रफिक भाई यांनी संमती दर्शुन बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात आपण साजरी करू असे त्यांनी यावेळी संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले


