Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Ram Sutar cremated : महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नांदेड महाराष्ट्र December 19, 2025

Ram Sutar cremated : महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुख्यमंत्री फडणवीस यांची आदरांजली
NNL TeamBy NNL TeamDecember 19, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवी दिल्ली| जगप्रसिद्ध शिल्पकार महाराष्ट्रभूषण राम सुतार यांच्या पार्थिवावर आज नोएडा येथील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आदरांजली वाहिली.

जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे शिल्पकार राम वंजी सुतार यांचे वृद्धापकाळाने नोएडा येथील निवासस्थानी वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले होते. आज दुपारी नोएडा येथील वैकुंठ भूमीत संपूर्ण शासकीय इतमामात स्व. सुतार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने यावेळी मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी आदरांजली वाहिली. श्री.रावल म्हणाले, जागतिक कीर्तीचे महान शिल्पकार पद्मविभूषण राम सुतार यांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सह अनेक ऐतिहासिक शिल्पांच्या माध्यमातून भारताची ओळख जागतिक पातळीवर नेली. त्यांच्या निधनाने कला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. हुबेहूब आणि जिवंतपणा हे त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य होते.त्यांची शिल्पे ही त्यांच्या महान कार्याची नेहमी साक्ष देतील.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले महाराष्ट्राचे सुपुत्र राम सुतारजी यांचे शिल्पकला क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांसह अनेक मान्यवरांचे पुतळे बनवले. त्यांनी दिल्लीमध्ये राहून महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविला. त्यांच्या कलाकृती अजरामर राहतील. त्यांचे पुत्र त्यांचा वारसा चालवतील असेही श्री आठवले यांनी सांगितले.

अंत्यसंस्कारापूर्वी स्व. सुतार यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त व सचिव आर विमला, माहिती संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे यांनी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. तसेच गौतम बुद्ध नगरच्या जिल्हाधिकारी मेधा रुपम यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. कला, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह स्व.सुतार यांच्या चाहत्यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे पुत्र अनिल सुतार यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

गेल्याच महिन्यात श्री. सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण 2024’ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी नोएडा येथे जाऊन त्यांच्या निवासस्थानी प्रदान केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांची भावपूर्ण श्रद्धांजली
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुतार यांच्या पुत्र अनिल सुतार यांना दूरध्वनी करून शोकसंवेदना व्यक्त केल्या. ते म्हणाले, काहीच दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी ‘महाराष्ट्र माझा’ गीताच्या ओळी उच्चारल्या होत्या, तेव्हा आम्ही भारावून गेलो होतो. वयाच्या 100 व्या वर्षीही ते इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामात गुंतले होते. त्यांची शिल्पे शतकानुशतके जिवंत राहतील आणि प्रत्येक शिल्प पाहताना त्यांचेच स्मरण होईल. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, राम सुतार यांच्या निधनाने शिल्पकलेचा ‘कोहिनूर’ काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांनी भारतीय संस्कृती आणि महापुरुषांचे विचार जगभर पोहोचवले. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, संसदेतील महात्मा गांधींचा पुतळा अशा अजरामर कलाकृतींमुळे ते सदैव जिवंत राहतील. वयाच्या 100 व्या वर्षापर्यंत कलेची साधना करणाऱ्या सुतार यांनी हजारो कलाकारांना मार्गदर्शन केले. त्यांच्या जाण्याने शिल्पकलेचे विद्यापीठच हरपल्याची भावना आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त करत म्हटले आहे की, राम सुतार यांच्या निधनामुळे शिल्पकलेच्या क्षेत्रातील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल यांसारख्या महापुरुषांच्या शिल्पांद्वारे देशाचा इतिहास जिवंत केला आणि भारतीय स्मारक शिल्पांना जागतिक ओळख मिळवून दिली. ग्रामीण भागातून उदयास आलेल्या या साध्या-नम्र शिल्पकाराने आयुष्याच्या शेवटपर्यंत कलेची साधना केली आणि अनेक कलाकारांना घडवले. त्यांची शिल्पे युगानुयुगे आठवण करून देत राहतील. त्यांच्या कुटुंबीयांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत अजित पवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांची शोकभावना
सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी शोक व्यक्त करत म्हटले आहे की, राम सुतार यांनी शिल्पांना केवळ आकारच दिला नाही, तर त्यात राष्ट्राचा आत्मा, संस्कृतीचा अभिमान आणि इतिहासाचे जिवंत दर्शन घडवले. त्यांच्या प्रतिभेने भारताची ओळख जागतिक पातळीवर उजळून निघाली. हा तेजस्वी वारसा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत कायम प्रेरणादायी राहील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना त्यांनी केली.

Maharashtra Bhushan Ram Sutar cremated with state honours
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleKarma Yogi : अभावावर प्रेम करा हा मंत्र बाबांनी दिला- कर्मयोगी प्रकाश आमटे यांचे प्रतिपादन
Next Article डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक व उच्चक्षमतेची सिटी स्कॅन मशीन नव्याने कार्यान्वित
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Maharashtra Public Libraries Act Amendment : महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम सुधारणा संदर्भातील अहवालाचे सादरीकरण -NNL

August 6, 2024

Organization of organ donation awareness rally | शनिवारी अवयवदान जनजागृती रॅलीचे आयोजन – NNL

August 1, 2024

CIDCO ; लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सिडको येथे अभिवादन

July 18, 2025

Bhokar police took action : भोकर पोलिसांनी माफियाविरुध्द कारवाई करुन 2 लक्ष 45 हजार रुपयाचा गुटखा पकडला -NNL

December 21, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Swami Ramanand Tirtha Marathwada University ; हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिन आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन

‘श्री महालक्ष्मी महात्म्य’ पुस्तिका सात भाषांमध्ये -NNL

Suryakantatai Patil : मराठवाड्याच्या भुमितिल एक निस्वार्थ,निर्मोही आदर्श नेतृत्व…मा. सूर्यकांताताई पाटील

Chief Minister my beloved sister | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नांदेड जिल्ह्यात 48 हजारावर अर्ज दाखल -NNL

Online Admit Card of 10th Exam : दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना सूचना

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?