लोहा| मुंबईच्या जे डब्ल्यू मॅरेड अंधेरी येथील हॉटेलमध्ये जागतिक र्किर्तीचे दंतरोपण करणारे पोर्तुगाल येथील प्रसिद्ध डॉक्टर आरमांडो लुपास व्हिएटनाम येथील डॉ. डो तहन तसेच चेन्नई येथील गुलशिलन राजन, व डॉ चंद्रशेखर या ख्यातनाम डॉक्टरांच्या उपस्थितीत देश पातळीवरील’ दंत रोपण’ परिसंवाद व चर्चासत्र पार पडले. या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिसंवादात लोहयाचे भूमीपूत्र प्रसिद्ध दंततंज्ञ डॉ. दिनेश चव्हाण यांनी मार्गदर्शन व अनुभव विशद करण्याचा बहुमान त्यांना मिळाला


जागतिक स्तराव इन्पलॅन्ट (दंतरोपण) करण्यात पोर्तुगाल देशातील डॉ. लुपास,, व्हिएटनामचे डॉ. डो तहान, यांच्या प्रमुख उपस्थितीत चेन्नई येथील जागतिक किर्तीचे दंतरोपण तंत्र गुलशिलन राजन (चेन्नई) डॉ. चंद्रशेखर (चेन्नई) यांची विशेष उपस्थिती होतीत बार पडलेल्या’ परिसंवादासाठी मराठवाड्यातून डॉ दिनेश माणिकराव चव्हाण (मुकदम) डॐ सुचितन प्रधान (मुंबई) यांची उपस्थिती होती.


जागतिक कितींच्या दंतरोपण तेज्ज्ञाच्या प्रमुख मार्गदर्शन नंतर डॉ. दिनेश चव्हाण यांनाही त्यांचे अनुभव व मार्गव करण्याचा बहुमान मिश्रण. दंतरोग व दंत प्रत्यारोपण’ यावर डॉ. दिनेश यांनी अभ्यासपूर्ण अनुभव मांडले. देशभरातून आलेले १७० डॉक्टर प्रभावित झाले. यापूर्वी डॉ. दिनेश मुकदम यांना’ अमेरिकेच्या सेंटर ऑफ एक्सलन्स’ हा आवर्ड मिळाला त्या प्रतिष्ठीत व सन्मानामुळे डॉ. दिनेश यांना’ या जागतिक पातळीवरील परिसंवादात चर्चा व व्याख्यान देण्याचा बहुमान मिळाला. आपल्या १४-१५ वर्षाच्या दंतरोग रुग्ण सेवेसाठी हा मोठा बहुमान होय अशी भावना भूमिपूत्र दिनेश मुकदम यांनी व्यक्त केली.
