नवीन नांदेड| महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम बळीरामपूर नांदेड येथे महामानव श्रीसंत रोहिदास महाराजांच्या मंदिराची इ.स. 1983 मध्ये रितसरपणे स्थापना करण्यात आली आहे.


तत्कालीन मुख्यमंत्री मा.ना. श्री अशोकरावजी चव्हाण, व तत्कालीन पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय व खार जमीन तथा पालकमंत्री नांदेड चे रविशेठ पाटील यांचे अध्यक्षतेखाली दि. 12 ऑगस्ट 2009 रोजी बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. सदरील बैठकीत शासन ग्राम विकास विभाग यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मा.श्री भास्कररावदादा पाटील खतगांवकर खासदार नांदेड यांच्या केवळ पुढाकाराने श्री संत रोहिदास महाराज मंदिर ट्रस्ट बळीरामपूर ता.जि. नांदेड यास तिर्थक्षेत्र ‘क’ चा दर्जा देण्यात आला.


ज्यासाठी इ.स. 1990 पासून सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात आले. त्यापूर्वी दि. 3 नोव्हेंबर 2008 रोजी आदरणीय श्रीमती प्रतिभाताई पाटील मॅडम, राष्ट्रपती, भारत सरकार यांची त्यांच्या कार्यालयीन सुरक्षा पास क्रमांक 002549 अन्वये त्यांचे वामनराव विष्णुपूरीकर, संस्थापक श्री संत रोहिदास महाराज मंदिर ट्रस्ट, इंद्रजित उर्फ मुन्ना पांचाळ, सरपंच व संभाजी जाधव पाटील उपसरपंच यांनी प्रत्यक्ष भेटी दरम्यान चर्चा करुन गावाच्या ट्रस्ट मंदिराच्या विकासास्तव भेट घेतली.


दरम्यानच्या काळात कार्यसम्राट मा.आ.श्री मोहनअण्णा हंबर्डे यांनी सदरील तिर्थक्षेत्राच्या विकासकामी बरीचशी तरतुद उपलब्ध करुन दिली. यापुढे तिर्थक्षेत्र वर्ग ‘क’ चा दर्जा मिळालेल्या सदरील तिर्थक्षेत्रास वर्ग ‘ब’ चा दर्जा मिळणेस्तव इ.स. 2014 पासून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत असताना मा.श्री. मोहनअण्णा हंबर्डे आमदार दक्षिण नांदेड यांनी जाणीवपूर्वक यशस्वी प्रयत्न केले व सदरील तिर्थक्षेत्रास वर्ग ‘ब’ चा दर्जा मिळवून दिला.

त्यासंबंधाने शासन ग्राम विकास विभाग यांचेकडून त्यांच्या कार्यालयाचे आदेश क्रं. ई-1336250/यो-13 दि. 29.09.2025 रोजी निर्गमीत करण्यात आलेले आहेत. सदर शुभवार्ता करताच मा.खा. श्री. भास्कररावदादा पाटील खतगांवकर, मा.आ. आनंदराव तिडके पाटील बोंढारकर, मा.आ. किशनराव वानखेडे, मा. सरदार लड्डूसिंग महाजन आदींनी आनंद व्यक्त करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
प्रस्तुत प्रकरणी ग्रामपंचायत बळीरामपूर, ग्रामीण पोलिस ठाणे सिडको, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय इतवारा, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद बांधकाम कार्यालय, जि.प. सामान्य प्रशासन विभाग कार्यालय, बळीरामपूर ग्रामस्थ, ज्ञात व अज्ञात सहकार्य मित्रमंडळी यांच्या सहकार्याबद्दल सदर तिर्थक्षेत्राचे संस्थापक वामनराव मे. विष्णुपूरीकर तथा सेवानिवृत्त कक्ष अधिकारी, जि.प. नांदेड यांनी अंतःकरणपूर्वक आभार मानले.
सदरील महत्त्वपूर्ण शासन निर्णयामुळे सदरील तिर्थक्षेत्र व बळीरामपूर गावाच्या विकासास निश्चितच चाचलना मिळणार असल्याचे व सदरील प्रकारचे महादलित तिर्थक्षेत्र हे सध्यातरी महाराष्ट्रातील एकमेव असल्याबाबत तिर्थक्षेत्राचे संस्थापक वामनराव मे. विष्णुपूरीकर यांच्याकडून कळविण्यात आले आहे.


